शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील संस्था व्यवस्थापन समितीमध्ये अशासकीय सदस्यांचे नामनिर्देशन करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
🔹 शासन निर्णयातील प्रमुख बाबी
- राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांपैकी PPP अंतर्गत असलेल्या 250 संस्था वगळून उर्वरित 169 संस्थांपैकी 75 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- या 75 संस्थांमध्ये प्रत्येकी 3 अशासकीय सदस्य नामनिर्देशित करण्यात आले आहेत.
- संबंधित सदस्यांची नावांची यादी “प्रपत्र-अ” मध्ये जोडण्यात आली आहे.
- अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ शासन निर्णयाच्या दिनांकापासून कमाल 3 वर्षे किंवा शासनाचे पुढील आदेश यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहील.
- संबंधित सदस्यांना यापूर्वीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.

No comments:
Post a Comment