शेतकरी, भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; अपघात झाल्यास मिळणार 2 लाखांपर्यंत मदत
योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?
या योजनेअंतर्गत खालील व्यक्ती पात्र ठरू शकतात :
- विहित निकषांनुसार नोंद असलेले खातेदार शेतकरी
- भूमिहीन शेतमजूर
- महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 अंतर्गत “महिला शेतकरी” म्हणून प्रमाणपत्र मिळालेल्या महिला
- संबंधित शेतकरी, भूमिहीन शेतमजूर किंवा महिला शेतकऱ्यांच्या कुटुंबातील 10 ते 75 वर्षे वयोगटातील आई-वडील, पती/पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, घटस्फोटित मुलगी आणि विधवा मुलगी
या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास संबंधित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसदार सानुग्रह अनुदानासाठी पात्र ठरू शकतात.
अपघाताच्या स्वरूपानुसार रु. 1 लाख ते रु. 2 लाखांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
| अपघाताची घटना | मिळणारे अनुदान |
|---|---|
| अपघाती मृत्यू | ₹2,00,000 |
| दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे | ₹2,00,000 |
| एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे | ₹2,00,000 |
| एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे | ₹1,00,000 |
कोणते अपघात योजनेत ग्राह्य धरले जातील?
खालील प्रकारच्या अपघातांना योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो :
- रस्ता किंवा रेल्वे अपघात
- पाण्यात बुडून मृत्यू
- कीटकनाशके हाताळताना किंवा अन्य कारणाने विषबाधा
- विजेचा धक्का
- वीज पडून मृत्यू
- खून
- उंचावरून पडणे
- सर्पदंश व विंचूदंश
- नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या
- जनावरांच्या हल्ल्यामुळे जखमी होणे किंवा मृत्यू
- बाळंतपणातील मृत्यू
- दंगलीतील मृत्यू किंवा अपंगत्व
- आकस्मिक अपघातामुळे झालेला अंतर्गत रक्तस्राव
- उष्माघात
कोणत्या घटनांना लाभ मिळणार नाही?
नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न, जाणीवपूर्वक स्वतःला इजा करणे, युद्ध, सैन्यातील नोकरीदरम्यान झालेली घटना, जवळच्या लाभधारकाकडून झालेला खून, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, 10 ते 18 वर्षे वयोगटात वाहन चालविताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या प्रभावाखाली झालेला अपघात आणि मोटार शर्यतीतील अपघात यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.
लाभासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
1. खातेदार शेतकरी
- 7/12 उतारा किंवा ॲग्रीस्टॅक अंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र
- मृत्यूचा दाखला
- गाव नमुना 6-क नुसार मंजूर झालेली वारस नोंद
- वय व ओळख सिद्ध करणारे कागदपत्र, जसे शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र
2. भूमिहीन शेतमजूर
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- मागील एक वर्षाच्या आत e-Shram पोर्टलवर भूमिहीन शेतमजूर म्हणून नोंदणी
- मृत्यूचा दाखला
3. महिला शेतकरी
- महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 अंतर्गत “महिला शेतकरी” प्रमाणपत्र
- मृत्यूचा दाखला
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
अपघाताच्या प्रकारानुसार अतिरिक्त कागदपत्रे
अपघाताच्या प्रकारानुसार इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, पोलिस तपासाचा अंतिम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल, वैद्यकीय प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना इत्यादी कागदपत्रे आवश्यक असू शकतात अपंगत्वाच्या बाबतीत डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र किंवा रुग्णालयीन नोंदी तसेच संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा?
अपघाताची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी व चौकशी केली जाईल. या पथकाने घटना घडल्यापासून 8 दिवसांच्या आत अहवाल तहसीलदारांकडे सादर करायचा आहे. अपघातग्रस्त शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांनी आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे 2 महिन्यांच्या आत सादर करायचा आहे. अपवादात्मक परिस्थितीत या मुदतीत वाढ करण्याचे अधिकार तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रस्तावाची छाननी झाल्यानंतर पात्र व पूर्ण प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केला जाईल. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये 30 दिवसांच्या आत लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात
योजनेअंतर्गत मंजूर होणारे अनुदान लाभार्थी किंवा त्यांच्या वारसदारांच्या बँक खात्यात थेट DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. तसेच योजनेची माहिती, कागदपत्रे आणि लाभाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी Integrated Online Portal कार्यान्वित करण्यात येणार आहे.
तालुका व जिल्हास्तरावर समित्या
योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष संबंधित तहसीलदार असतील. या समितीत गट विकास अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी असून, ही समिती तालुकास्तरीय निर्णयाबाबत उद्भवलेल्या अडचणी, तक्रारी आणि लाभाबाबतच्या वादांवर कार्यवाही करेल.
FAQ
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना –
1. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणजे काय?
शेती व्यवसाय करताना शेतकरी, भूमिहीन शेतमजूर किंवा महिला शेतकरी तसेच त्यांच्या पात्र कुटुंबीयांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना आहे.
2. या योजनेचा नवीन कालावधी किती आहे?
ही योजना 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
3. या योजनेत कोण लाभ घेऊ शकतो?
विहित अटींनुसार नोंद असलेले खातेदार शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, तसेच महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 अंतर्गत “महिला शेतकरी” प्रमाणपत्र मिळालेल्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
4. शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही योजनेचा लाभ मिळतो का?
होय. पात्र शेतकरी, भूमिहीन शेतमजूर किंवा महिला शेतकऱ्यांच्या कुटुंबातील आई-वडील, पती/पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, घटस्फोटित मुलगी आणि विधवा मुलगी यापैकी 10 ते 75 वर्षे वयोगटातील सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
5. अपघाती मृत्यू झाल्यास किती अनुदान मिळते?
अपघाती मृत्यू झाल्यास ₹2 लाख सानुग्रह अनुदान देय आहे.
6. दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास किती मदत मिळते?
दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास ₹2 लाख अनुदान देय आहे.
7. एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास किती मदत मिळते?
अशा परिस्थितीत ₹2 लाख सानुग्रह अनुदान देय आहे.
8. एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास किती अनुदान मिळते?
अशा परिस्थितीत ₹1 लाख अनुदान देय आहे.
9. कोणते अपघात योजनेत ग्राह्य धरले जातात?
रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडणे, कीटकनाशकांमुळे विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडणे, खून, उंचावरून पडणे, सर्पदंश/विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे जखमी होणे किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगलीतील मृत्यू/अपंगत्व, आकस्मिक अपघातामुळे अंतर्गत रक्तस्राव आणि उष्माघात यांचा समावेश आहे.
10. नैसर्गिक मृत्यू झाल्यास योजनेचा लाभ मिळतो का?
नाही. नैसर्गिक मृत्यू योजनेअंतर्गत ग्राह्य धरला जात नाही.
11. आत्महत्येच्या प्रकरणात योजनेचा लाभ मिळतो का?
नाही. आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.
12. अमली पदार्थांच्या प्रभावाखाली झालेल्या अपघाताला लाभ मिळतो का?
नाही. अमली पदार्थांच्या प्रभावाखाली असताना झालेला अपघात योजनेअंतर्गत ग्राह्य नाही.
13. मोटार शर्यतीतील अपघाताला लाभ मिळतो का?
नाही. मोटार शर्यतीतील अपघात योजनेअंतर्गत ग्राह्य धरला जात नाही.
14. 10 ते 18 वर्षे वयोगटातील व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास लाभ मिळतो का?
नाही. 10 ते 18 वर्षे वयोगटात वाहन चालविताना झालेला अपघात लाभासाठी अनुज्ञेय नाही.
15. खातेदार शेतकऱ्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
7/12 उतारा किंवा ॲग्रीस्टॅक अंतर्गत प्राप्त शेतकरी ओळखपत्र, मृत्यूचा दाखला, गाव नमुना 6-क नुसार मंजूर झालेली वारस नोंद आणि वय/ओळख सिद्ध करणारे कागदपत्र आवश्यक आहे.
16. भूमिहीन शेतमजुरासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
आधार कार्ड, रहिवासी दाखला, मागील एका वर्षाच्या आत e-Shram पोर्टलवर भूमिहीन शेतमजूर म्हणून केलेली नोंदणी आणि मृत्यूचा दाखला आवश्यक आहे.
17. महिला शेतकऱ्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 अंतर्गत मिळालेले “महिला शेतकरी” प्रमाणपत्र, मृत्यूचा दाखला, आधार कार्ड आणि रहिवासी दाखला आवश्यक आहे.
18. रस्ता किंवा रेल्वे अपघातासाठी कोणती अतिरिक्त कागदपत्रे आवश्यक आहेत?
इन्क्वेस्ट पंचनामा आणि शवविच्छेदन अहवाल आवश्यक आहे. वाहन चालविताना अपघात झाला असल्यास संबंधित मोटार वाहन परवानाही आवश्यक आहे.
19. सर्पदंश किंवा विंचूदंशाच्या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आवश्यक आहे का?
शासन निर्णयानुसार वैद्यकीय उपचारापूर्वीच मृत्यू झाल्यास शवविच्छेदन अहवालातून सूट दिली जाऊ शकते. मात्र संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्याने प्रतिस्वाक्षरी केलेले असणे आवश्यक आहे.
20. अपंगत्वाचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
अपंगत्व किंवा अवयव निकामी झाल्याचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र किंवा रुग्णालयाच्या नोंदी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र/जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
21. योजनेचा प्रस्ताव किती दिवसांत सादर करावा?
अपघातग्रस्त शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांनी आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण प्रस्ताव 2 महिन्यांच्या आत संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सादर करावा.
22. दोन महिन्यांची मुदत वाढवता येते का?
अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मुदतवाढ आवश्यक असल्यास, संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना मुदतवाढीबाबत विवेकाधीन निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.
23. अपघाताची चौकशी कोण करणार?
संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त पथकाकडून प्रत्यक्ष भेट देऊन सखोल तपासणी केली जाईल.
24. अपघाताची चौकशी किती दिवसांत पूर्ण करायची आहे?
संयुक्त पथकाने घटना घडल्यापासून 8 दिवसांच्या आत चौकशी करून अहवाल संबंधित तहसीलदारांकडे सादर करायचा आहे.
25. योजनेचा लाभ देण्याचा निर्णय कोण घेते?
संबंधित तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये पात्र लाभ देण्याबाबत निर्णय घेतला जातो. हा निर्णय 30 दिवसांच्या आत घेण्याची तरतूद आहे.
26. अनुदानाची रक्कम कशी मिळणार?
लाभाची रक्कम लाभार्थी किंवा त्यांच्या कायदेशीर वारसदारांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.
27. या योजनेत ऑनलाइन पोर्टलची सुविधा आहे का?
होय. योजनेची माहिती, डेटा अचूकता, सुलभ उपलब्धता, सुरक्षितता आणि योजनेच्या परिणामांचे रिअल-टाइम विश्लेषण यासाठी Integrated Online Portal कार्यान्वित करण्यात येणार आहे.
28. अन्य सरकारी अपघात योजनेचा लाभ घेतला असल्यास या योजनेचा लाभ मिळेल का?
नाही. संबंधित व्यक्तीने किंवा कुटुंबातील सदस्याने शासनाच्या अन्य विभागाच्या अपघातग्रस्तांसाठीच्या योजनेचा लाभ घेतला असल्यास, या योजनेअंतर्गत लाभासाठी तो/ती पात्र ठरणार नाही. शासन निर्णयात ऊसतोड कामगारांसाठीच्या योजनेचे उदाहरण दिले आहे.
29. मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसदारांची निवड कोणत्या क्रमाने केली जाते?
कायदेशीर वारसदारांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे :
- पती/पत्नी
- अविवाहित मुलगी
- आई
- मुलगा
- वडील
- सून
- घटस्फोटित मुलगी/विधवा मुलगी
- अन्य कायदेशीर वारसदार
३०. या योजनेची अंमलबजावणी कोण करणार?
योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषी), महाराष्ट्र राज्य, पुणे यांची आहे. योजनेचा त्रैमासिक आढावा घेऊन प्रगती अहवाल शासनास सादर करण्याची तरतूद आहे.

No comments:
Post a Comment