7/12 विषयी

Saturday, September 5, 2026

महसूल सेवक ( कोतवाल ) पदभरती २०२६

 

महसूल सेवक ( कोतवाल ) पदभरती २०२६ : 

२९१२ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने महसूल सेवक (कोतवाल) पदभरती सन २०२६ बाबत महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. राज्यातील ३१ मे २०२६ रोजी रिक्त असलेली २९१२ महसूल सेवकांची पदे भरण्यास शासनाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत ही भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोतवाल पदे भरताना संबंधित शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

📅 कोतवाल भरती २०२६ संभाव्य वेळापत्रक

प्रक्रिया

दिनांक

तालुकानिहाय रिक्त जागांची यादी        १ ते ७ सप्टेंबर २०२६
रिक्त जागेनुसार बिंदू नामावली        ८ ते १५ सप्टेंबर २०२६
परीक्षा भरती समिती स्थापना        १६ सप्टेंबर २०२६
जाहिरात प्रसिद्ध            २ ते १७ ऑक्टोबर २०२६
अर्जांची छाननी        १८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६
प्रवेशपत्र उपलब्ध        ४ ते १० नोव्हेंबर २०२६
परीक्षा        ११ नोव्हेंबर २०२६
उत्तरसूची व निकाल घोषणा        १२ नोव्हेंबर २०२६
दस्तऐवज पडताळणी        १३ ते २० नोव्हेंबर २०२६
नियुक्तीपत्र        २६ नोव्हेंबर २०२६

जिल्हानिहाय रिक्त पदे

शासनाच्या पत्रासोबत दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकूण २९१२ महसूल सेवक (कोतवाल) पदे रिक्त आहेत. जिल्हानिहाय मंजूर, भरलेली आणि रिक्त पदांची सविस्तर माहिती शासनाच्या पत्रात देण्यात आली आहे. 


महत्त्वाचे : वरील वेळापत्रक शासनाच्या पत्रात नमूद केलेले आहे. भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पद्धती, परीक्षा शुल्क, आरक्षण व इतर अटी स्पष्ट होतील.

महसुल सेवक कोतवाल पदभरती बाबत महाराष्‍ट्र शासनाचे अधिकृत पत्र डाऊनलोड करा व येथे क्लिक करुन वाचा. - महसुल सेवक कोतवाल पदभरती अधिकृत पत्र

महत्त्वाच्या सूचना

  1. जिल्हाधिकारी अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत प्रक्रिया राबविण्यात येईल.
  1. संबंधित शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे.
  1. भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  1. जिल्हानिहाय उपलब्ध रिक्त पदांच्या विवरणानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
  1. पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटींसाठी संबंधित शासन निर्णय व अधिकृत जाहिरात तपासावी.
  1. अर्ज प्रक्रिया, निवड पद्धत आणि इतर अंतिम तपशील संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत सूचनेनुसार तपासावेत.

 FAQ

महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 मध्ये किती पदे आहेत ?

महसूल सेवक (कोतवाल) पदांची एकूण 2,912 रिक्त पदे आहेत.

महसूल सेवक भरतीची रिक्त पदे कोणत्या तारखेच्या आधारावर आहेत ?

रिक्त पदांची गणना 31 मे 2026 या आधार तारखेवर करण्यात आली आहे.

महसूल सेवक भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण करायची आहे ?

भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महसुल सेवक पद भरती २026 (कोतवाल) भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?

उपलब्ध पत्रानुसार प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणार आहे. अर्जाची अंतिम पद्धत संबंधित अधिकृत जाहिरातीनुसार तपासावी.

कोणत्या विभागात सर्वाधिक रिक्त पदे आहेत ?

दिलेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर विभागात 685 रिक्त पदे आहेत.

जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती कुठे मिळेल ?

जिल्हानिहाय रिक्त पदांची संपूर्ण माहिती वरील जिल्हानिहाय रिक्त पदे या तक्त्यामध्ये दिली आहे.


स्रोत : महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग — महसूल सेवक (कोतवाल) पदभरती सन २०२६ बाबत पत्र, दिनांक ०३ सप्टेंबर २०२६. 


No comments:

Post a Comment